Saturday, July 11, 2020

किलबिल कविता - भाग १


गणपती - अधीपती 

 
चंद्रासारखा गोरा पान 
म्हणतात त्याला गणपती छान
 
लालबागचा तो राजा
गुणगाण गाते त्याची प्रजा
 
मुकुट त्याचे पिवळे धमक
हातात त्याचे मोहक मोदक
 


रुची शरद माळकर


==================================================================================

माँ

बडे बडे ना समज सखे हैं माँ का प्यार
आधे तो करते हैं उसको इनकार
माँ के प्यार मे हैं अनमोल खजाना
जिसको पाने नही लगता कोईभी बहाना

तुम डांढती हो, हँसती हो, रुठाती हो
मारने के बाद खुब प्यार करती हो
तुम्हारे संघ खिची फोटो, मै मेरे मन मे बसाऊंगी
क्यों की उसमे होगी तुम्हारे जैंसी प्यारी माँ

हम हर बार मौज मनाते हैं
मौज मनाते भूक लग जाती है
और घर का खाना जब तुम पकाती हो
तो वो खाना सबसे स्वादिष्ट लगता हैं
 
हमारे जीवन में तुम्हारा जीवन अनमोल हैं
माँ हम नही जी सकते तुम्हारे सिवा
भगवान को शुकरिया की उसने मुझे तुम जैसीं माँ दी
नही तो मेरी जिंदगीका सफर अधुरा ही रहता
 


ध्रुव भरत माळकर

==================================================================================


Nature Treat  🌲🌷🍎

A seed you throw
A tree you grow
A fruit you eat
This is the Nature’s treat

Nature has green color's symbol 
It has trees big and tall
The flower smell so sweet
This is the Nature’s treat
 
The river is flowing
The nature is growing
They are so clean and neat
This is the Nature’s treat


Dhruv Bharat Malkar

==================================================================================


Toy

I am a Toy, I am a Toy  
All play with me
Also a girl or a boy

My names are many
As you know some
Like a buddy and teddy

Don’t break me don’t throw me
I am a Toy
Only play with me


Dhruv Bharat Malkar

==================================================================================



मंगळावरची शाळा

सव्वीसाव्या शतकात 
भरेल मंगळावरची शाळा
मंगळावरच्या शाळेत
मुलांना आकाशाचा लळा

गाड्यांची गरज नसेल
शाळेत पोहोचायला
पुस्तके नसतील तिथे
धडे शिकवायला

बाईंना लिहायला
खडू, फळा नसेल
पण ऑक्सिजनचा सिलिंडर
तिथे नक्कीच असेल

गुरुत्वाकर्षणा शिवाय
हवेत सर्वे तरंगू
आकाशात उडत उडत
नाचू व गाऊ

आई नाही उठणार
सकाळी डबा बनवायला
जेवणाची गोळी घ्यायची
भूक न लागायला

एवढी चांगली मंगळावरची
शाळा असणार
घरी जाताना मुलं
हसत बागडत जाणार


ध्रुव भरत माळकर

==================================================================================


बाई

एक नंबर आहेत आमच्या बाई
अभ्यासाच्या वेळी
नाही त्यांची घाई
 
शिकवतात आम्हाला बाई
शिकवतात त्या
मराठी ठायी – ठायी
 
मायाळू आहेत आमच्या बाई
म्हणून त्या आमच्या
दुसऱ्या आई


ध्रुव भरत माळकर

==================================================================================


झाड वाचवा


झाड सर्वांचा मित्र असतो
आपण त्याचा वापर करतो
 
झाडाला वाचवणे आहे उपयोगी
तरच जग राहील निरोगी
 
झाड माणसांना प्राणवायू देतात
तरीही मांणस त्यांना मारतात
 
झाड वाचवा झाड जगवा
जीवनाला अजून वाढवा


ध्रुव भरत माळकर

==================================================================================



Friday, May 22, 2020

कोरोना गजाली


मालवणी कोरोना गजाली 
  

कोरोनाच्या महाभयंकर संकटावर मात करण्यासाठी पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आणि सर्व काही एकाच जागी थांबलं गेलं. प्रत्येकजण स्वखुषीने नाही पण कोरोनाच्या तसेच पोलीसांच्या दंडुक्याच्या भितीने घरीच थांबू लागले.

नो मॉर्निंग वॉक... नो इविनींग वॉक, नो गार्डन... नो जिम, नो मार्केट... नो शॉपिंग, नो सिनेमा... नो लाईव शो, नो पिकनीक... नो विक एंड... सर्व सर्व काही बंद म्हणजे बंद. पव्लिक, वर्क फ्रॉम होमच्या नांवे फक्त आणि फक्त घरीच थांबू लागले. अश्या ह्या लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काही दिवसात तर खुपच कंटाळा येत होता. मग मित्रांना फोन करा, पाहुण्या मंडळींना नाहीतर मग गाववाल्यांना. यातूनही कंटाळा आला तर मग व्हॉटस्अप, इंटरनेट किंवा TV तर आहेतच. जेव्हापासून हे व्हॉटस्अप पब्लिकच्या आयुष्यात आलय तेव्हापासून माझ्याजवळ रिकामा वेळ आहे असं कोणाला वाटणचं बंद झालय.

सतत व्हॉटस्अप, इंटरनेट किंवा टीवी यांचाही हळूहळू कंटाळा येऊ लागला. अश्यावेळी गाववाल्यांना किंवा पाहुणे मंडळींना फोन केल्यावर एकच गोष्ट बोलली जायची ती म्हणजे, ‘गावी जायला मिळालं पाहीजे होत’. तर अश्याच एका गाववाल्याला मी फोन केला ज्याला फोनवर एक एक तास बोलायची सवय आहे. परंतु नेहमीप्रमाणेच त्याचा फोन बीझी येत होता. थोड्यावेळानंतर त्याचाच फोन धडाडला आणि मुंबईतील कोरोना पासून गोष्टींना सुरुवात झाली ती चीन, अमेरीका, इंग्लंड अशी जगवारी करुन आमच्या कोकणातल्या गावी जावून थांबली.

“काय रे इतको येळ कोणाशी बोलत होतस?” मी विचारलं

“नाय तो अमुक होतो...” आता हा काय सांगणार, कोणाशी बोलत होतो ते याची कॉन्टॅक्स काय कमी आहेत. असो, मी पण काही जास्त खोलात जाऊन विचारण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर आमच्या कोरोना गजालींना सुरुवात झाली.

“काय रे घरात बसान कंटाळो इलोहा की नाय?”

“अरे नाय कसो... तुझा आपला बरा हा, हेच्या तेच्याशी फोनवर बोलान नायतर चाटींग करुन तरी येळ जाता”

“कसलो रे येळ जाता, कीती फोनवर बोलत आणि चाटींग करत बसतलस, आता हेचोपण कंटाळो ईलोहा. गावाक एकदा जावक गावलेला तर बरा होता. सरकारनेपण काय फालतुगिरी केल्यान लगेचच ट्रेन बंद करुन टाकल्यान. दोन दिवस तरी ट्रेन चालू ठेवक व्हये होते, मी तर गावाकच जाणार होतय. लॉकडाऊन असला तरी गावाक बाकी काय टेन्शंन नाय, भायर भुतूर थोडा फीराक गावता आणि कंटाळो पण नाय येणा”

“हो रे, आता स्वत:ची गाडी नायतर भाड्यान गाडी घेवन जावक इला असता पण तेका परमिशन नाय. सगळीकडे जिल्हा बंदी केल्यानी हा”

“अरे जिल्हा बंदी खयली गाव बंदी हा. गावात तर ह्या वाडीतून त्या वाडीवर जावक देणत नाय. जय थय रस्त्यांवर आडे घातल्यांनी हत आणि आपल्यासारखो एखादो चाकरमानी तेंका दीसलो तर मग काय बघूकच नको. जसा काय भुत बघल्यासारख्या करतत”

“होय रे काय सांगतलस, पण हय ह्या खोलयेत रवान रवान जीव घुसमाटाक लागलो हा. पोरा तर शापच कंटाळांन गेली हत”

“हो, गरमी पण जाम वाढली हा. ह्या वन आरके आणि १० बाय १० च्या खोलयेत रवाक व्हया, दुपारचा तर ह्या फॅनच्या हवेन आणखीनच हुलपाक होता. असा वाटता ह्या कोरोनान मरण्यापेक्षा घुसमाटानच मराक होयत.”

“हं.. गावाक कसा गरमी असली तरी इतक्या काय वाटणा नाय. खळ्यात तरी खुर्ची टाकून हडे तडेचे गजाली तरी मारुक गावतत. हडे ह्या खोलयेच्या भायर पाय टाकूक भेटणा नाय. नाक्या नाक्यावर पोलिस दांडे घेवन उभे आसत”

“होय बा, ता तर याक नसाता लफाडा हा. तुका म्हायत हां?”

“काय?”

“त्यादिवशी आपलो तो मधल्या वाडीतलो बाळू, गाढव नाक्यावर रवता तो, असोच सकाळी आरामात उठलो नाष्टापाणी केल्यान नी मित्रासोबत नाक्यार गेलो. नाक्यावरच्या बसटॉपवर दोघय व्हॉटस्अपवर टायमपास करीत बसलेले. तेवढ्यातच इले पोलिस, हे मेले व्हॉटस्अपात गुंग झालेले. ह्या मेल्यांचो लक्षच नाय. पोलिसांनी धरल्यानी, तुम्ही हय येवन टायमपास करतात ता तुमका घर नाय म्हणत बरे दोन दोन दांडे नको त्या जागेवर ठेवन दिल्यानी. बाळू सांगा होतो, दोन दिवस झाले तरी अजून ते फटके दुखतत”

“हाहाहा... मेल्यांनो गप घरात बसाचा सोडून कीत्याक भायर फिरक होया”

“बघ तरी, पण आता इतक्या स्ट्रिक नाय, शेवटी पोलिस पण कंटाळतत ना. कीती जणांका तरी समजायत बसतले”

“हो ना, आता तेंकाच तेंचो जीव नको झालो हा. बिचाऱ्या बऱ्याच पोलिसांकापण करोनाची लागण झाली हा”

“होय तर... ह्या मेल्या चिनी लोकांवर फटकी भरली ना खयसून ह्यो विषाणू आणल्यानी काय म्हायत. पुऱ्या जगाची वाट लावन टाकल्यानी”

“काय सांगतलस लोकांचे उपासमारीची येळ ईली हा. ह्या असाच चालू रवला तर नोकऱ्या धंद्यांचेपण वांदे होतले”

“आमच्यासारख्या प्रावेट नोकरेवाल्यांका तर टेंन्शनच हा... ह्या सगळा टेंन्शन आसताना आमचा सरकार सांगता आत्मनिर्भर बना. डोमलाचा आत्मनिर्भर बनतलं! ह्यो शब्द उच्चारतानाच घसो कोरडो पडता”

“हो ना... अमेरिका, इंग्लंड, इटली, फ्रान्स, रशिया यासारख्या मी मी म्हणाऱ्या देशांनी ह्या कोरोना पुढे हात टेकल्यानी हत. आपलो ते कोण रे... ”

“कोण?”

“ते रे अमेरिकेचे अध्यक्ष, आत्ताच मोदीनी तेंका गुजराताक हाडलेल्यानी ते”

“हां...हां... ते... डोनाल्ड ट्रम्प. ते तर चिनच्या नावांन दगडच फोडतत”

“हो. मेल्या सध्या परिस्थितीच तशी कठीण हा. आपल्या महाराष्ट्रात तर खुपच पेशन्ट वाढतत. मुंबईत तर बघुचीच सोय नाय”

“मुंबईत वाढतले नायतर काय. मुंबईतली लोकसंख्याच इतकी हा की जो तो उठता तो मुंबईत. महाराष्ट्रातलोच नायतर, देशातलो, जगातलो माणूस सुध्दा मुंबईत येवक बघता. इतर येळाक रस्त्यावर चलाक वाव नसता. त्यात ह्यो करोना सारखो भयानक विषाणू, तेका अश्या गर्देत पसराक काय येळ लागता. झोपडपट्ट्यानी तर बघूकच नको १५०-२०० खोलयांसाठी एकत्रच बाथरुम संडास. मग काय सांगुक व्हया. आता ह्या अत्यावश्यक आणि दिनक्रमाच्या कामांसाठी लॉकडाऊन काय कामाचा हा सांग बघू”

“हाहाहा... ”

“कठीण हा बा, पुढे कसा काय होताला देवाकच म्हायत. पावसपण तोंडार इलो हा”

“होय तर, आता ह्या परप्रांतियांसाठी स्पेशल ट्रेन, बस चालू केल्यानी हत. तेंका फुकट गावाक जावक भेटता. आमच्या कोकणासाठी पण अशेच दोन चार ट्रेन चालू करुचे तर नाय. ते एसटी चालू केल्यांनी, ते पण स्वत:चा तिकीट काडून जायचा”

“बघ तरी, आम्ही तर गेल्या पंधरा वर्षात ह्या लाल डब्यान प्रवासच करुक नाय. आताच्या पोरांका तर असल्या प्रवासाची सवयच नाय, त्यांका चक्कर येता, गाडी लागता. कोण ती लफडी काढीत बसतोलोहा”

“आता आपणाक जावचा असला तर स्वत:च पास काढायचो आणि बाकी सगळी परमिशना घेवन स्वत:ची नायतर भाड्याची गाडी घेवन जावचा ह्याच याक उरला हा.”

“होय, पण भाड्यान गाडी करुन जावक काय सगळ्यांका थोडाच परवाडतला”

“ता तर आसाच म्हणा आणि थय जावन तरी काय, १४+१४, २८ दिवस क्वारंटाईन रवाक व्हया”

“होय, आणि क्वारंटाईन करतले थयसर सगळी सोयपण नसतली. परत गावात तसाच काय झाला तर धड औषध पाण्याची सोयपण नाय”

“पण ह्या १०-१२ दिवसात बरेच लोक गावाक गेलेत हा”

“हो, आपलो तो टेमावरचो भाई आणि मदन दोघय आपली बिराडा घेवन गेलेत. पयले जे गेलेत त्यांका शाळेत ठेयल्यांनी आता शाळापण फुल झाली म्हणतत.”

“काय सांगतस”

“होय रे, काय दिवस ईलेहत ते बघ, शहरात पोरांका हायस्कुलात अँडमिशन घेवचा असला तर हायस्कुल फुल होता आणि सध्या गावाक माणसांका क्वारंटाईन करुन ठेवक शाळेत जागा भेटना नाय. कायपण परिस्थिती ईली हा.”

“होय ह्या मात्र खरा बोललस... पण आता कोण कोण जातत तेंका कोणाचा रिकाम्या घर असला तर त्या घरात रवाक परमिशन देतत म्हणता. तो मदन गेलो तेका तेच्या भवकेचा घर हा तेच्यात रवाक दिल्यानी”

“काय सांगतस?”

“होय रे”

“तसा रवाक भेटाला तर बरा हा”

“वाटता बरा पण त्रास पण तसोच हा. तो भाई सांगा होतो, तेका तपासणीसाठी सरकारी हॉस्पिटलात घेवन गेले थय चार तास लायनीत रवाचा लागला. धड पाणीपण नाय भेटना”

“ता तर आसाच, लोकाच इतकी गावाक जावक लागली हत थय सरकार तरी खय सगळ्यांची सोय करताला”

“ता पण खराच म्हणा.”

“आज मदनाक फोन केललय तो सांगा होतो, गावातलो एक माणूस देखील आमच्या आजूबाजूक फिराकना नाय. काय काय लोकांनी तर आमच्या घराकडना जावचे वाटे पण बदलल्यांनी. ग्रामपंचायत, आरोग्य विभागाची माणसा दर दिवशी चौकशीसाठी येतत. ह्या सगळा बघून आम्ही कोरोनाचेच पेशंन्ट आसव की काय असा वाटाक लागला हा.”

“हाहाहा...”

“कठीण हा बा... खराच कठीण हा”

“बरा आपून कधी जावया?”

“कसो जातलस, माका मधी मधी कामार जावचा लागता. तरीपण बघया, अजून थोडे दिवस जावने”

“हो... हो”

“चल बा... माझ्या फोनची बॅटरी संपत ईली हा”

“हो चल, तुका आता दुसरे फोन येवची येळ झाली असतली”

“हाहाहा... तुझा मेल्य़ा काय नकोताच”

“बाय....”


पण खरच पुढे काय होणार हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. हे संकट पुढे कधी संपणार आणि सर्व सुरळीत कधी होणार याचेच तर्क मांडले जात आहेत. सध्या तरी कोणीच निश्चित काही सांगू शकत नाही. एवढच सांगू शकतात की...,

घरी रहा सुरक्षित रहा !



Sunday, May 10, 2020

पत्रास कारण की.... ‘चला हवा येऊ द्या !’

‘चला हवा येऊ द्या !’ हा कार्यक्रम म्हटला की त्याबाबत कीमान महाराष्ट्रीयन श्रोत्यांना तरी काही सांगायची गरज लागत नाही. तर अश्या या कार्यक्रमातील कलाकाराना मी पत्र लिहीण्याचा प्रयत्न केला आहे.


प्रति,

डॉ. निलेश साबळे आणि टीम
चला हवा येऊ द्या !

बालपणापासून डॉक्टर या शब्दाची खूप भिती वाटायची. आजार म्हटलं की डॉक्टर आणि त्यावर उपचारासाठी डॉक्टरांकडून मिळणांर ते भलमोठ इंजेक्शन, सोबत कडवट मेडिसिनचा मारा नकोसा वाटायचा. अजूनही तो वाटतोच मात्र, आपण डॉ. निलेश साबळे हे रसायनच काही निराळ निघालं. ह्या डॉक्टरचा सहवास आणि आपल्याकडून मिळणारं टॉनिक नेहमीच हवहवसं वाटू लागलं. ‘हसताय ना सगळे?’ हा प्रश्न विचारत बेडवरील पेशंटलाही खळखळून हसायला भाग पाडतात.

नेहमीच हवाहवासा वाटणाऱ्या या आपल्या ‘चला हवा येऊ द्या !’ तून तूम्ही या महाराष्ट्रातीलच नव्हे तर एकूणच भारतात आणि परदेशात राहणाऱ्या मराठी माणसांच्या पलीकडे जावून अशी काही जादू केली की तुमचा हा आठवड्यातील दोन दिवसाचा डोस घेतल्याशिवाय राहवतच नाही.

‘चला हवा येऊ द्या’ हॉस्पिटलचे नांव 
डॉक्टर ‘निलेश साबळे’ त्यांचे नांव ||
भाऊ, भरत करतात सिझरींगच काम 
श्रेया, कुशल, सागर साकारतात सिस्टरचं काम ||
पडद्यामागील सर्वच कलाकार वॉर्ड बॉय 
सारा प्रेक्षक वर्ग बनून जातो सुदृढ बाळ ||

तुमच्या तमाम चाहत्यांपैकी मी एक सामान्य चाहता. मुंबईमध्ये एका प्राव्हेट सेक्टरमध्ये काम करत असताना रविवारच्या आठवडा सुट्टीनंतर येणारा प्रत्येक सोमवार थोडासा कंटाळवाणाच वाटायचा. मात्र आता हे बदलयं. हा सोमवार कधी येतो याची मी आतूरतेने, उत्सुकतेने वाट पाहत असतो. याला कारण ‘तू’ तूझी ‘पूर्ण टिम’ आणि तुझा तो ‘चला हवा येऊ द्या !’ सोमवार, मंगळवार रात्री ऑफीसमधून किंवा इतर कामासाठी बाहेर असलो तरी रात्री ९.३० वाजता झी चॅनल समोर बसावच लागतं. एखाद्यावेळी जेवण नसलं तरी चालेल मात्र तूझ्या त्या ‘हसताय ना!’ टॉनिकची आवश्यकता असते. अशामुळे रात्री वेळेत घरी यायची सवय झाली. घरामध्ये या दोन दिवसात काही महत्वाचे कार्यक्रम असले तरीही वेळात वेळ काढून ह्या हवेचा गारवा घ्यावासाच वाटतो.

भाऊ, भारत, सागर, कुशल, श्रेया, तुषार, विनित आणि इतरही धमाकेदार स्फोटके एका साच्यात बसवून वेगवेगळ्या रंगात उडवताना हास्याच्या कारंज्या फुटत असतात.
अश्या या कारंज्यात.....

सरपंचांची स्वागत... मान्यवरांची पंगत 
पप्पांची ओळख... पाहुण्यांची पाळख 
भास्करांच ज्योतिष... ग्राहकांना शापित 
भावाचा सिनेमा... कलाकारांना उष्मा 
सीआयडीचा दया... आरोपिंना माया 
पत्रकारांची परीषद... केबलची दहशत 
अदालती जज... पक्षकारांची खोज 
पोस्टमनांच पत्र वाचन... अरविदांच लेखण 
अर्थातच थुकरटवाडी... 

असे हे चटकदार, खुसखुशीत, लुसलुशीत खाद्य चघळत असतानाच पोस्टमन काका ‘बॉर्डर’ वर हजेरी लावतात. मनासा भावणारी आणि नेमकं मर्मावर बोट ठेवलेली पोस्टमन काकांची पत्रे आणि त्या वाचनातील ह्रदयस्पर्शी भाव नेमक सुचित करुन जातात. या आणि अशा ना-ना तऱ्हेच्या कलाकृती सादर करत असताना तुझ्या एकूणच कार्यक्रमातील लिखाण, सादरीकरण विनोदाचा दर्जा, पोषाख अफलातून आहे हे वेगळ सांगायची गरज नाही.

दूरदर्शनवरील प्रेक्षक वर्ग कधीच अश्या एका कार्यक्रमाला चिटकून बसत नाही. घरातील सर्व सदस्यांना एकाचवेळी एकच कार्यक्रम आवडला असं मी तर माझ्या घरात पाहीलं नाही. विशेष म्हणजे कधी नव्हे तो रिमोट ‘नवरे’ मंडळींच्या हाती असतो. असा हा तूझा एव्हरग्रीन कार्यक्रम खरोखरच सन्मानास पात्र आहे हे मी काही वेगळ सांगायला नको.

मुंबईसारख्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात असा करमणूकीचा आणि हास्यकल्लोळ अनुभवास मिळणे खूपच कठीण आहे. मात्र ‘चला हवा येऊ द्या !’ च्या माध्यमातून सातत्याने हे घडत आहे. त्याच बरोबर मराठीतील सिनेमा, नाटक, संगीत, साहीत्य, सामाजिक उपक्रम यासारख्या विविध विषयांना आणि आजी – माजी कलाकारांना थेट घराघरात पोचवण्याचं काम केले जात आहे. म्हणूनच या साचेबंद कार्यक्रमासाठी माझ्यासारख्या सामान्य चाहत्यांचा तूला आणि तूझ्या पूर्ण टिमला एक प्रेमपूर्वक सलाम ! 

बातमी पत्र

‘वाकडा नाव प्रकरण’ बातमी पत्र


‘वाकडा नांव प्रकरणा’च्या बातमीरुपी लिखाणा मागची पार्श्वभूमी –

एका सुंदर, छोट्याश्या गावातील बरेच लोक कामानिमित्त मुंबई, पुणे, कोल्हापूर अश्या विविध ठीकाणी वास्तव्य करत असतात. त्यातील काहीजण सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हाट्सएपवर ‘झंकार’ नांवाने ग्रुप बनवतात आणि हळूहळू समाजातील सर्वच बांधव, मित्रांना या ग्रुपमध्ये सामिल करुन घेतात.

करोनाच्या महाभयंकर संकटाच्या लॉकडाऊन कालावधीमध्ये सर्वच मेंबर ग्रुपमध्ये अँक्टीव असतात. एके दिवशी आमचे बुवा संजय गावधर ह्या ग्रुपवर जोक्स पाठवतात. हा जोक्स करोनाच्या झोन वर्गवारीवर असतो. तो असा...

“आता सोरगत जुळवची आसात तर इतर माहीती बरोबर कुठल्या झोनमध्ये आहेस ते पण सांगा”

तर अश्या या जोक्सवर जेष्ठ आणि प्रतिष्ठीत मेंबर अशोक माळघट कमेंट पास करतात. “उदी गावधऱ्याक पहीला सांगा...” यावर उदय गावधर यांचा मुलगा रितेश गावधर आक्षेप घेतात. “सरळ नांव घ्या जरा...” त्यावर अशोक माळघट “सॉरी बाबा उदय गावधर...” अश्या प्रकारे सॉरी बोलतात. परंतु हे प्रकरण इथेच न थांबता अशोक माळघट यांचे थोरले बंधू बाळा माळघट यांना अश्याप्रकारे सॉरी मागायला लावणे आवडत नाही. ते हे प्रकरण सिरियसली घेतात आणि त्यानंतर चालू होते नाराजी आणि सॉरी नाट्य.

अश्या या छोट्याश्या प्रकरणावर मी माझ्या नजरेतून गंमतीशीर रित्या बातमीरुपात केलेले वर्णन.


आजच्या ठळक बातम्या

१. ‘वाकडा नांव प्रकरणा’मुळे शांत असलेल्या झंकार गावधरवाडी ग्रुपमध्ये अचानक हाहाकार. प्रकरण मिटवण्यासाठी सुभाष गावधर यांचे चतूर चाणाक्य सुंदर माळघट यांना साकडं.

२. प्रकरण मिटवण्याबाबत सुंदर माळघट यांचा सुभाष गावधर यांना होकार. परंतु पडद्यामागे बाळा माळघट यांच्याशी वेगळच राजकारण शिजल्याची सूत्रांची खात्रीपूर्वक माहीती.

३. उदी (सॉरी उदय) गावधर यांचा संजय गावधर यांच्याद्वारे माफीनामा. माफीनामा रितेश गावधर यांच्या खिशात. तसेच सुभाष गावधर मंडळातील प्रमुख नेत्यांशी सतत फोनवरुन संपर्कात.

४. जाहीर माफीनाम्यानंतर रितेश गावधरांनी मोबाईलसहीत गवताच्या कुडीवर घेतली ध्यानधारणा. सर्व प्रकार व्हाट्सएपमुळे झाला असल्याच्या रागातून व्हाट्सएप मोबाईलमधून केले डिलीट.

५. अण्णा माळघट यांचा BP हाय झाल्यामुळे सतत पत्रलेखन करण्यात मग्न. घरातील अन्नधान्यांवर घाला. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार अण्णा माळघट मन:शांतीसाठी पांढरे कोंडीच्या दिशेने जातानाचे निदर्शनास.

६. आना गावधर लालबागला तर शरद माळघट माणगांव तिठ्यावर हत्ती वरुन पेढे वाटप करुन आनंद व्यक्त करण्यात मग्न. हत्तींची फौज दोडामार्गवरुन रवाना. थोड्याच वेळात ढोलताशांच्या तालावर मिरवणूकीला सुरुवात.

७. विजय धुरमार गावधरवाडी मध्ये स्वत:चाच विजय झाल्याच्या ऐटीत विजयी पताका फडकवत सतत वाडीमध्ये फेरफटका मारत असल्याचे रितेश गावधरांच्या निदर्शनास. जाब विचारल्यावर विजय धुरमार यांची त-त-फ-फ.

८. मोहन गावधर आयत्यावेळी माळघट समाजाच्या पार्टीत सामील होतील अशी दाट शक्यता असल्यामुळे गावधर समाज पार्टीतील प्रमुख नेते मोहनची मनधरणी करत असल्याची सुत्रांची माहीती.

९. निर्णायक क्षणी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तावमार पार्टीचा गावधर पार्टीला पाठिंबा असल्याचा VD (विरार-डोंबीवली) न्यूजचा रिपोर्ट. तरीही त्यांच्याच पार्टीतील नेत्यांचे एकमत नसल्यामुळे अद्याप जाहीर केला नाही निर्णय.

१०. समाजातील एक महत्वाचा परदेशी नेता निलेश गावधर फोनवरुन या प्रकरणाची खडानखडा माहीती घेत आहे. मायदेशी परतल्यावर योग्य ती दखल घेण्याचे केले सुतोवाच. त्यांचे फोन टॅप झाल्याने सर्व माहीती उघड.

११. ग्रुपमध्ये पहीला बॉम्ब भरत माळघट यांनी टाकून आता मात्र दोन्ही पार्टीच्या नेत्यांशी सतत फोनवर चर्चा करुन हास्याचा आनंद लुटताना आमच्या कॅमेरामध्ये बंदिस्त. या एकूणच घटनेवर नाटिका लेखण चालू असल्याचेही वृत्त.

१२. महेश गावधर, संतोष गावधर, आपा तावमार यासारखे महत्वाचे नेते व्दिदा मनस्थितीत. अद्याप कोणाला सपोर्ट करायचा हे न ठरल्यामुळे गोंधळलेल्या मनस्थितीत. तरीही ते मंडळातील काही नेत्यांना फोन करुन बहुमताचा अंदाज घेत आहेत.

१३. मंडळातील एक उच्चशिक्षीत, नॉन मराठी नेता सुभाष गावधर यांना Good job… Good co-ordination… अश्या अद्भूत शब्दांनी प्रोत्साहीत करत धीर देताना दिसत आहेत. मंडळालाही त्यांच्याकडून अश्याच कामगिरीची अपेक्षा.

१४. नेहमीच पाठीमागून बोलणारे दोन्ही पार्टीतील काही अतिहुशार नेते ग्रुपमध्ये मात्र मूग गिळून गप्प. परंतु हेच नेते रात्री अपरात्री कॉर्नर सभा घेऊन तसेच फोनव्दारे स्थानिक मतदारांना भडकवत असल्याची पुराव्यानिशी माहिती.

१५. ज्यांच्या सॉरी मुळे हे प्रकरण उद्भवलं ते अशोक माळघट आपला भ्रमणध्वनी बंद करुन मोजक्याच कार्यकर्त्यांसहीत अज्ञातस्थळी लॉकडाऊन झाल्याची माहिती.

१६. एकूणच प्रकरणामध्ये धडाडीचे नेते सुंदर माळघट यांच्याकडून बरेच भाष्य केले जाईल अशी अशोक माळघट यांना अपेक्षा होती. परंतु सुंदर माळघट यांनी मौन धारण करणेच पसंत केले. यामागे मोठे राजकारण शिजल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

१७. ज्यांच्या ‘सोरगत जुळव’च्या जोक्समुळे हे प्रकरण घडले ते संजय गावधर अति दडपणाखाली असल्याची सोशल मिडीयावर चर्चा. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण इथेच मिटवण्यासाठी प्रमुख नेत्यांना ३ - ३ बॉयलर कोंबड्या लाच देताना संजय गावधर यांना पोलिसांनी केली रंगेहात अटक.

१८. सध्यातरी हे वाकडा नाव प्रकरण शांत झालं असल्याचे वाटत असले तरी भविष्यात हे प्रकरण उग्र रुप धारण करेल असे राजकीय जाणकरांचे मत आहे.

याबरोबरचं हे ‘वाकडा नाव प्रकरण’ बातमी पत्र संपलं. जय गावधरवाडी.

 







Saturday, July 15, 2017

लव-ली सायकल


मी लाल रंगाची नवी कोरी लेडीज सायकल खरेदी केली होती. आता मी सायकल घेऊन आँफीसमध्ये येवू लागली होती. सुरुवातीला घाबरत घाबरत सायकल चालवायची, मात्र काही दिवसातच सराईतपणे चालवू लागली. तू देखील सायकलनेच यायचास. तूझी सायकल थोडी जूनी होती त्यामुळे बऱ्याच वेळा ती आजारीच असायची.

माझा २०-२५ मीनिटांचा तो सायकल प्रवास करत असताना आँफीसमध्ये पोचायला बऱ्याचवेळा उशीरच व्हायचा. तेव्हा तू आँफीसमध्ये बसलेला असायचा. मला चांगलच आठवत, जेव्हा मला उशीर व्हायचा तेव्हा माझा आँफीसातील प्रवेश अधिकच धावपळीचा असायचा. सायकल स्टॅण्डला लावून टीफीनची बॅग घेत धावतच प्रवेश करायची आणि त्याच वेगाने खुर्चीत बसून कामाला सुरुवात करायची.

तेव्हा तूझ्यासहीत इतरही स्टाफ आँफीसमध्ये बसलेला असायचा. कोणी काहीच बोलत नसायचे. सर्वजण आपापली काम करत असताना तू मात्र मध्येच खाली मान करुन टोमणा मारल्यागत...

मॅडमना आज उशीर झाल वाटतं...

एवढंच बोलून गप्प राहायचास. त्यानंतर मी मात्र रस्ता खराब असल्याच्या नांवाने दगड फोडत एकटीच बोलत राहायची आणि तू ते ऐकत आपलं काम करत असायचा.

तूझं आँफीसमधील वावरण सकाळच्या काही वेळा पुरतच असायचं. त्यानंतर तूझ जाणं येणं कुठे असायच याचा काही पत्ताच नसायचा. बऱ्याचवेळा तू आँफीसमध्ये सायकल घेऊन न येता चालतच यायचास. कधी आँफीसच्या कामानिमित्त बाहेर, कधी सामाजिक कार्या निमित्त बाहेर, तर काहीवेळा आँफीसच्या वेळेत तू क्रिकेटच्या मैदानात क्रिकेटचा आस्वादही घेत असायचा. असं तुझं ते एकाचवेळी वेगवेगळ्या क्षेत्रात वावरण बघून हेवा वाटायचा.

आँफीस सुटायच्या वेळेलाच कींवा बऱ्याचवेळा मी आँफीसमधून गेल्यानंतरच तू संध्याकाळच्या वेळेला आँफीसमध्ये यायचास. नाहीतर परस्पर बाहेरुनच घरी जायचास. सकाळी दर्शन घडल्यानंतर तुझं पुढचं दर्शन संध्याकाळी नाहीतर मग दुसऱ्या दिवशी हे ठरलेलच असायचं.

कधी कधी मी सायकलने घरी जात असताना तू मात्र त्याच रस्त्याने चालत जाताना दिसायचास. तेव्हा मात्र मी सायकलाचा थोडा वेग वाढवून निघून जायची. मला त्या खराब रस्त्यामुळे सायकल चालवायला कंटाळा यायचा कींवा आँफीसमधून निघायला उशीर झाला तर मी सायकल आँफीसमध्येच ठेवून घरी जायची. असंच एके दिवशी मी माझी सायकल लॉक करुन आँफीसमध्ये ठेवत असताना नकळत तू मला प्रश्न केलास.

मॅडम, मी तुमची सायकल घेऊन जावू का?”

आणि मी क्षणाचाही विलंब न लावता ‘हो म्हणून तूझ्या समोर सायकलची चावी ठेवली. त्यानंतर बऱ्याच वेळा तू माझी सायकल घेवून जावू लागलास. माझी ती लाल रंगाची नाजूक सायकल असली तरीही तूला ती चालवताना बघायला छान वाटायचं.

हळू-हळू या सायकलच्या निमित्ताने आपल्यातील बोलणं वाढत गेल आणि नकळत आपण एकमेकांच्या जवळ होत गेलो. त्याचाच प्रत्यय म्हणून एके सकाळी तुझ्या तोंडून निघालेले ते “I Love You” शब्द माझ्या कानावर पडले. तेव्हा मी मात्र घाबरूनच गेलेली. त्यानंतरचे दोन-तीन महीने मी “Yes-No” च्या मनस्थितीत वावरत होती.

माझा होकार आला नव्हता तरीही तू माझी सायकल घेवून जायच सोडलं नव्हत आणि मीही ती हक्काने तुला देत होती. कारण सायकलच आमच्यातील मध्यस्थीच काम निभावत होती.

शेवटी मी होकार दिलाच, तेव्हा तुझ्या चहऱ्यावरची लाली आणि त्या सायकलची लाली अधिकच खुलून उठली होती. पुढे पुढे तू माझी सायकल हक्काने घेऊन जावू लागलास. कींबहूना माझ्या लव-ली सायकलला तुझ्याच चालवण्याची सवय झाली होती.

अशी ही आपल्याला एकत्र बांधून ठेवणारी आपली लव-ली सायकल होती.

-अक्षरवटिका

Saturday, December 3, 2016

एक हजारी अर्ध हजारी


तारीख ८ नोव्हेंबर, वेळ रात्री ८ ची... ८ ला ८ च्या ठोक्याला आपल्या पंतप्रधान महोदयांच मेरे प्यारे देशवासींयो... प्यारे भाई बहनों... हे ब्रीद वाक्य तमाम जनतेच्या कानावर पडलं आणि क्षणातच भारत देशात हाहाकार माजला. गरीब-श्रीमंत, सामान्य-वीआयपी, शेतकरी-नोकरदार, दलाल-व्यापारी आणि विशेष म्हणजे व्हाईट मॅन ते ब्लॅक मॅनपर्यंत सर्वजणच हादरुन गेले. न्यूज चॅनलवर नोटाबंदी चालू असतानाच व्हाट्सअँपवरुन ही बातमी काही क्षणातच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचली. १०-१५ मिनीटे होता न होता तोच व्हाट्सअँप वर विनोदी मेसेजनी थैमान घातलं.

एवढ्यातच आमच्या हजारीने पाचशीला फोन केला.
अर्ध हजारी    - हॅलो..... बोल गं
एक हजारी    - हॅलो..... अगं मी बोलते... हजारी
अर्ध हजारी    - हो... हो ओळखलं, मला वाटलेलचं तू फोन करणार ते.
एक हजारी    - काय, कशी आहेस.
अर्ध हजारी    - एकदम मस्त, तू कशी आहेस?
एक हजारी    - मी तर फस्तच... बरं, बातमी समजली का?
अर्ध हजारी    - नाही समजायला काय झालं, मी तर इथेच आहे.
एक हजारी    - कुठे?
अर्ध हजारी    - मेदीकाकांच्या खिशातच, सर्व काही आँखो देखा हाल कॉमेंट्री ऐकत आहे.
एक हजारी    - अरे व्वा... तू तर या सुवर्ण क्षणाची साक्षीदारच बनलीस म्हणायचं.
अर्ध हजारी    - हो गं, बरं तू कुठे आहेस?
एक हजारी    - अजून कुठे असणार... पवरकाकांच्या खिशात
अर्ध हजारी    - हीहीही... तू तर नेहमी त्यांच्याच खिशात असते. मला तर त्यांच्या खिशात चुकून कधीतरी राहायची संधी भेटली तर. पवरकाकांनी तर त्या शंभरी कींवा पन्नासीला नो एन्ट्रीचा बोर्डच लावून टाकलाय म्हणे…! हे खर आहे का?
एक हजारी    - खरंच आहे ते, अश्या छोट्यांना ते सोबत घेतच नाहीत. “हम सस्ते चिजोंका शौक नही रखतेंअसंच त्यांच असतं.
अर्ध हजारी    - त्यांच चालू दे... तू सांग, तूला आता कस वाटतयं?
एक हजारी    - कस वाटतय! मला तर बाई आनंदाच्या उकाळ्याच फुटल्या आहेत. पण फुटल मेल आमच ते नशीब या पवरकाकांच्या खिशात मी तर पुरती कोंबूनच गेली आहे.
अर्ध हजारी    - आता मात्र सुटलीस एकदाची
एक हजारी    - हो ना... बरीच वर्षे झालेली कधी एकदा बरबरटलेल्या लोकांच्या जाळ्यातून सुटते असंच झालेलं.
अर्ध हजारी    - हो गं... मागचे आपले घरमालक सिंगाकाका, आम्हाला बदलायला बघत होते पण त्यांना कोणी काही ते जमूच दीलं नाही.
एक हजारी    - सर्वच चोराचे साक्षीदार कस जमू देणार. ते बिचारे २५, ५० पै ला बंद करुन गप्प बसले.
अर्ध हजारी    - हो ना... कींमत नसलेल्यालाच झीरो करुन बसले.
एक हजारी    - त्यांच काही न बोललेलचं बरं, आपल्याला खुपच भ्रष्ट करुन सोडलं बाई त्यांनी... अगं मागच्या महीन्यात मी त्या अंबाभाईच्या घरी होते तेव्हा मला थोडीफार कूणकूण लागलेली, हे असं काहीतरी होणार याची.
अर्ध हजारी    - मेली तू कधी काही असं बोलली नाहीस?
एक हजारी    - कसं बोलणार, मी तर त्या हजारांच्या बंडलामध्येच कोंबून गेलेली. तोंड उघडायला जागाच नव्हती.
अर्ध हजारी    - त्यांच काय बाई, सगळचं त्यांच्या मुठ्ठी मे”
एक हजारी    - हो ना, पण खर सांगते हां... अगं आपल्यासाठी हपापलेले लोक ह्या निर्णयापर्यंत पोहचतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. शेवटी मेदीकाकांनी ते करुन दाखवलं.
अर्ध हजारी    - नाही गं... सर्वांनाच दोषी देवून नाही चालणार. या देशात बरेच प्रामाणिक माणसंदेखील आहेत जे आमचा वापर सन्मानाने करतात आणि मेहनतीचच स्विकारतात.
एक हजारी    - हे मात्र तूझ खरं आहे. अशी माणसं आहेत म्हणूनच तर आज हा निर्णय झाला. नाहीतर कुटच काय, लक्ष्मीच्या नांवाने आमची पूजा करायची आणि चुकीच्या मार्गांनी, बेहीशेबी, गोरगरीबांना लुबाडूण मर्यादेपेक्षा आमची साठवणूक करायची.
अर्ध हजारी    - मनातलं बोललीस बाई तू, या निर्णयाने बड्याबड्यांच्या पोटात दुखणार, काहींच्या झोपाही उडतील तर काहीजण या विरोधात आंदोलनही करतील.
एक हजारी    - हो ना... अस तर होणारचं
अर्ध हजारी    - तुला तर माहीतच आहे, आमचा वापर कीती गलीच्छ पध्दतीने व्हायचा.
एक हजारी    - हो तर...
अर्ध हजारी    - काहींनी तर आमच्याच सेम टू सेम कॉपी करुन या बाजारात आणल्या आणि आम्हा खऱ्यांची कींमतच कमी केली.
एक हजारी    - हो गं... अश्याने तर कष्टाने कमवणारे लोकही आम्हाला स्विकारत नव्हते.
अर्ध हजारी    - हो ना, शंभरवेळा तरी पारखून निरखून बघायचे. शिवाय आमचा सिरियल नंबर देखील नोंद करुन ठेवायचे. आपल्या वरचा ना विश्वासच उडालेला बघ.
एक हजारी    - सुटलो बाई... सुटलो एकदाचे
अर्ध हजारी    - आता ती दोन हजाराची महाराणी आली आहे.
एक हजारी    - हो समजलं. तिने तर आल्या आल्याच रंग दाखवायला सुरुवात केली.
अर्ध हजारी    - हीहीही... आपण मेली एवढी वर्षे आहोत पण कधी असा रंग बदलला नाही.
एक हजारी    - हो ना... आणि वर म्हणते माझी कॉपी कोणीच करु शकत नाही.
अर्ध हजारी    - अगं तिने हा जग पाहीलाय कुठे? आत्ताच तर आली आहे. थोडे दिवस जाऊ दे, तिला तेही समजणार, या दुनियेतील लोक कीती महाभाग आहेत ते.
एक हजारी    - हीहीही... तेव्हा मात्र तिचा पुरता रंग उडालेला असेल.
अर्ध हजारी    - चल गं... आमच्या मेदीकाकांची मुलाखत संपली. उध्या सकाळपासून बँकेतच भेटू.
एक हजारी    - हो हो... मस्त एसीमध्ये बसूनच गप्पा मारु. बाय...
अर्ध हजारी    - बाय... गुड डिसीजन!!!


भरत वि. माळकर

Friday, December 2, 2016

हवाहवाई...

विमान निघाले आणि ते तांत्रिक बिघाडामुळे पडणार असे जाहीर होते...

फार फार तर आमचा प्रवास कोंकण-मुंबई-कोंकणजसा ‘पुणे-मुंबई-पुणे’. फरक एवढाचं कोंकण-मुंबई-कोंकण या नांवाने चित्रपट बनवायचा बाकी आहे.

असा हा आमचा कोंकणचा प्रवास गेली कित्येक वर्षे तोट्याची का असेना पण हक्काच्या आपल्या महाराष्ट्र शासनाच्या लाल डब्याच्या बसमधून बाय रोडने चालू आहे. अलीकडेच काहीवेळा तो झुकझुक आगगाडीतूनही होत असतो. आता मात्र या प्रवासाला आमचे होममिनिस्टर फार कंटाळून गेले होते. होममिनिस्टर का, मुख्यमंत्रीच म्हणा, सर्व महत्वाची खाती त्यांच्याकडेच, आमच्याकडे  फक्त सर्वसाधारण खाती.
तर अश्या या आमच्या होममिनिस्टरांच्या इच्छेखातर आणि प्रदीर्घ चर्चेअंती उड्डाण करायचं ठरलं. त्यांना हवाई वाहतूकीचा अनुभव घ्यायचा होता तर आम्हाला हवाई सुंदरीना जवळून न्याहाळायचं होतं. हे आमच्या मनातलं, आणि जरी का मोकळेपणाने तोंड उघडलं तरी आम्हा पुरुष्यांच्या मताला कीती कींमत असते...? तुम्हाला काय वेगळ सांगायची गरज नाही.
शेवटी दोन सिटचं बुकींग झालं तेही क्रेडीट कार्डव्दारे. आता या कार्डच बिल दिवाळी बोनस मधून भरायचं. तोपर्यंत हवा-हवाई समजून दर महीन्याला फक्त व्याज पे व्याज करत राहायचं. आपल्यासारख्या नोकरदारांचे आवाज फक्त दिवाळी बोनसपुरतेच मर्यादीत असतात.

शेवटी उड्डाण करायचा दिवस उजाडला अर्थातच विमान प्रवासाचा. सामानांच्या मोठ मोठ्या पाच बॅगा भरल्या, नेहमीप्रमाणे लाल डब्याच्या प्रवासाची सवय.

अहो, सर्व बॅगा व्यवस्थित पॅक केलात ना?” …बेडरुममधून आरश्यासमोर मेकअप चालू असतानाच एक दमदार आवाज दरवाज्याच्या फटीतून माझ्या छोट्याश्या कानावर येऊन आदळला.
हो केल्या... तू जरा लवकर तयार हो बघू .....मी आपल बोलायचं म्हणून बोललो.
हां झालं, तूम्हा मेल्या पुरुषांच बरं असतं, पिशवीत पाय घातलं की झालं. आम्हा मेल्या   स्रियानांच हे एवढ कराव लागतं...ठरलेलं उत्तर मिळालं
आता स्रियादेखील पिशवीत पाय घालतात म्हणे ...मी घाबरतच उत्तर दीलं
हो...हो माहीत आहे...कधी हौस म्हणून काही करायला दील का?”
नाही गं मला तसं काही म्हणायचं नव्हतं, तरीपण, ह्या पाचही बॅगा पॅक करुन झाल्या आणि मीही पॅक झालो तरीही तू पॅक होतेसच म्हणून म्हटलं. बाकी आपलं तस काही नाही. तुझं चालूदे”
हां बस्स झालं, चला निघूया. आणि हो माझ्या आई –पप्पांच सर्व सामान व्यवस्थित भरल ना, आणि माझ्या साड्या, ड्रेसत्यांना चूरगळ्या पडणार नाहीत अश्या लावल्यात ना
हो गं बाई, चला आता...

एका प्रदीर्घ वेळेनंतर आमच्या मॅडम कश्याबश्या बाहेर पडल्या. टॅक्सी पकडली आणि एअरपोर्टला जायला निघालो. एअरपोर्टमध्ये प्रवेश केल्या केल्या पहीली धाड या बॅगांवर. प्रवाशांसोबत ठराविकच किलोचे सामान घेता येत हे आम्हाला प्रथमच समजलं. आणि तिथूनच आमच्या होममिनिस्टरनी लाल डब्याशी तुलना करणे चालू केलं. आता सामान कमी करण्याची वेळ आली अर्थातच कमी कोणाचे होणार तर आपलंच. तीच्या माहेरच्या मेंबर्सच्या वस्तू कमी करणे आपल्या हातात नव्हतं. आपण बाहेर कीतीही सिंहाच्या डरकाळ्या फोडल्या किंवा शहाणपणा दाखविला तरी त्या एका स्त्रीशक्ती समोर आपण मांजरच असतो हे नव्याने सांगायला नको.

प्रत्यक्षात विमानात बसायची वेळ येते. आपल्या सीट न शोधता हवाई सुंदरी शोधण्यास माझ्या नजरा गरागरा फिरत होत्या तर होममिनिस्टर विमानाचा इंटीरिअर भाग पाहण्यात दंग होत्या. शेवटी आसन पादांकृत केल्यानंतर हवाई सुंदरीच्या मदतीने सीट बेल्ट लावून घेतल्या. काही वेळानंतर इंग्लीशमधून इंस्ट्रक्शन येऊ लागली.

“Ladies and gentlemen, the captain has turned on the Fasten Seat Belt Sign. We request that all mobile phones, papers…..”

अश्या बऱ्याच इंस्ट्रक्शन आमच्या डोक्यावरुन जात होत्या. आमचे होममिनिस्टर तर शुन्यातच पाहत होत्या.
काही वेळातच Take-off घेण्यात आला होता. हवाई वाहतुकीचा सुखद अनुभव घेत घेत आम्ही तोता-मैना सारखे आकाशात भरारी घेत होतो. आम्हा उभयतांच्या चहऱ्यावर खुशीकी लहरे उमटत होती. साधारणता १०-१५ मिनिटांचा खेळ होतो न होतो तोच एक सुचना आली.

विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते कोसळण्याची शक्यता आहे. तरीही आमचे टेक्नीशीयनस् धोका टाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहेत

पूर्ण विमानात “O My God” असा आवाज येवून आराडा ओरड चालू झाली. आमचे होममिनिस्टर मात्र शांतच होते. कारण ती सूचना इंग्लीश मधून असल्यामुळे त्यांना काही समजलचं नाही आणि आम्हांला काही उमगलं नाही. मात्र ज्यावेळी आम्हाला हे समजलं त्यावेळी मेलो मेलोओरडत बांधलेला बेल्ट तोडून माझ्यासहीत आम्ही सीटवरच उभे राहीलो.
सर्वजण विमान कोसळू नहे म्हणून चर्चा करत होते, देवाचा धावा करत होते. तर आम्ही उभयतांच हवाई वाहतूक करण्यास कोण कसे जबाबदार आहे यावरुन जोरदार भांडण चालू झाल, तेही सीटवरचं उभ राहून.
मला तर कधी नव्हे तो मुद्दाच सापडलेला. एवढं असूनही माझा विजय होईल याची शाश्वती नव्हतीच. तरीही मी काही मुद्दे रेटून धरण्याचे ठरवले.

तरी तुला मी सांगत होतो रेल्वेने जाऊ, नाहीतर आपली हक्काची लाल डब्याची बस तर आहेच. पण नाही तुलाच या हवाई प्रवासाचा नाद होता, आता चला ढगात. इथून आकाशही चार हातावर आहे कमी खर्चात वर पोचवू
हो-हो मलाच बोला, नेहमी मलाच घालून पाडून बोलत असतात. आणि तुमचं काय, विमानात आल्यापासून बघतेयं तुमचा लक्ष फक्त त्या नर्तिका बघण्यातच आहे.
हो-हो, तू विषय बदलू नकोस... कधी स्वत:ची चूक कबूल केलीस? नाही.
यात माझी कसली चूक आली? मला काय स्वप्न पडलेलं, हे असं होणार ते?”

असं हे आमचं भांडण जवळपास ४०-४५ मिनीटे न थांबताच चालू होतं. फक्त मारामारी करायची बाकी होती. शेवटी नेहमीप्रमाणे मलाच माघार घ्यावी लागली. मी गप्प झालो तरीही होममिनिस्टरांचा पट्टा चालूच होता. मी भानावर आलो, बघतो तर काय विमानातील इतर सर्व प्रवासी शांत आपापल्या सिटवर बसून आमच्या तमाशाचा आनंद लूटत होते. मी तीला थांबवलं. आम्हाला अशा अवतारामध्ये पाहून सर्व प्रवासी खो-खो हसायला लागले आणि म्हणाले अहो मिस्टर अँण्ड मिसेस्... आपल्यावरील संकट टळलयं आणि आपण सुखरुप गोव्याला पोहचलो

तेवढ्यातच, “Ladies and Gentlemen, Welcome to Goa airport…!” अस काहीस कानावर पडलं आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.

मात्र यापुढे हवाई वाहतुक नाही, यावर आम्हा उभयतांचा शिक्कामोहर्त झाला.



- भरत माळकर, मुंबई