Sunday, May 10, 2020

बातमी पत्र

‘वाकडा नाव प्रकरण’ बातमी पत्र


‘वाकडा नांव प्रकरणा’च्या बातमीरुपी लिखाणा मागची पार्श्वभूमी –

एका सुंदर, छोट्याश्या गावातील बरेच लोक कामानिमित्त मुंबई, पुणे, कोल्हापूर अश्या विविध ठीकाणी वास्तव्य करत असतात. त्यातील काहीजण सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हाट्सएपवर ‘झंकार’ नांवाने ग्रुप बनवतात आणि हळूहळू समाजातील सर्वच बांधव, मित्रांना या ग्रुपमध्ये सामिल करुन घेतात.

करोनाच्या महाभयंकर संकटाच्या लॉकडाऊन कालावधीमध्ये सर्वच मेंबर ग्रुपमध्ये अँक्टीव असतात. एके दिवशी आमचे बुवा संजय गावधर ह्या ग्रुपवर जोक्स पाठवतात. हा जोक्स करोनाच्या झोन वर्गवारीवर असतो. तो असा...

“आता सोरगत जुळवची आसात तर इतर माहीती बरोबर कुठल्या झोनमध्ये आहेस ते पण सांगा”

तर अश्या या जोक्सवर जेष्ठ आणि प्रतिष्ठीत मेंबर अशोक माळघट कमेंट पास करतात. “उदी गावधऱ्याक पहीला सांगा...” यावर उदय गावधर यांचा मुलगा रितेश गावधर आक्षेप घेतात. “सरळ नांव घ्या जरा...” त्यावर अशोक माळघट “सॉरी बाबा उदय गावधर...” अश्या प्रकारे सॉरी बोलतात. परंतु हे प्रकरण इथेच न थांबता अशोक माळघट यांचे थोरले बंधू बाळा माळघट यांना अश्याप्रकारे सॉरी मागायला लावणे आवडत नाही. ते हे प्रकरण सिरियसली घेतात आणि त्यानंतर चालू होते नाराजी आणि सॉरी नाट्य.

अश्या या छोट्याश्या प्रकरणावर मी माझ्या नजरेतून गंमतीशीर रित्या बातमीरुपात केलेले वर्णन.


आजच्या ठळक बातम्या

१. ‘वाकडा नांव प्रकरणा’मुळे शांत असलेल्या झंकार गावधरवाडी ग्रुपमध्ये अचानक हाहाकार. प्रकरण मिटवण्यासाठी सुभाष गावधर यांचे चतूर चाणाक्य सुंदर माळघट यांना साकडं.

२. प्रकरण मिटवण्याबाबत सुंदर माळघट यांचा सुभाष गावधर यांना होकार. परंतु पडद्यामागे बाळा माळघट यांच्याशी वेगळच राजकारण शिजल्याची सूत्रांची खात्रीपूर्वक माहीती.

३. उदी (सॉरी उदय) गावधर यांचा संजय गावधर यांच्याद्वारे माफीनामा. माफीनामा रितेश गावधर यांच्या खिशात. तसेच सुभाष गावधर मंडळातील प्रमुख नेत्यांशी सतत फोनवरुन संपर्कात.

४. जाहीर माफीनाम्यानंतर रितेश गावधरांनी मोबाईलसहीत गवताच्या कुडीवर घेतली ध्यानधारणा. सर्व प्रकार व्हाट्सएपमुळे झाला असल्याच्या रागातून व्हाट्सएप मोबाईलमधून केले डिलीट.

५. अण्णा माळघट यांचा BP हाय झाल्यामुळे सतत पत्रलेखन करण्यात मग्न. घरातील अन्नधान्यांवर घाला. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार अण्णा माळघट मन:शांतीसाठी पांढरे कोंडीच्या दिशेने जातानाचे निदर्शनास.

६. आना गावधर लालबागला तर शरद माळघट माणगांव तिठ्यावर हत्ती वरुन पेढे वाटप करुन आनंद व्यक्त करण्यात मग्न. हत्तींची फौज दोडामार्गवरुन रवाना. थोड्याच वेळात ढोलताशांच्या तालावर मिरवणूकीला सुरुवात.

७. विजय धुरमार गावधरवाडी मध्ये स्वत:चाच विजय झाल्याच्या ऐटीत विजयी पताका फडकवत सतत वाडीमध्ये फेरफटका मारत असल्याचे रितेश गावधरांच्या निदर्शनास. जाब विचारल्यावर विजय धुरमार यांची त-त-फ-फ.

८. मोहन गावधर आयत्यावेळी माळघट समाजाच्या पार्टीत सामील होतील अशी दाट शक्यता असल्यामुळे गावधर समाज पार्टीतील प्रमुख नेते मोहनची मनधरणी करत असल्याची सुत्रांची माहीती.

९. निर्णायक क्षणी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तावमार पार्टीचा गावधर पार्टीला पाठिंबा असल्याचा VD (विरार-डोंबीवली) न्यूजचा रिपोर्ट. तरीही त्यांच्याच पार्टीतील नेत्यांचे एकमत नसल्यामुळे अद्याप जाहीर केला नाही निर्णय.

१०. समाजातील एक महत्वाचा परदेशी नेता निलेश गावधर फोनवरुन या प्रकरणाची खडानखडा माहीती घेत आहे. मायदेशी परतल्यावर योग्य ती दखल घेण्याचे केले सुतोवाच. त्यांचे फोन टॅप झाल्याने सर्व माहीती उघड.

११. ग्रुपमध्ये पहीला बॉम्ब भरत माळघट यांनी टाकून आता मात्र दोन्ही पार्टीच्या नेत्यांशी सतत फोनवर चर्चा करुन हास्याचा आनंद लुटताना आमच्या कॅमेरामध्ये बंदिस्त. या एकूणच घटनेवर नाटिका लेखण चालू असल्याचेही वृत्त.

१२. महेश गावधर, संतोष गावधर, आपा तावमार यासारखे महत्वाचे नेते व्दिदा मनस्थितीत. अद्याप कोणाला सपोर्ट करायचा हे न ठरल्यामुळे गोंधळलेल्या मनस्थितीत. तरीही ते मंडळातील काही नेत्यांना फोन करुन बहुमताचा अंदाज घेत आहेत.

१३. मंडळातील एक उच्चशिक्षीत, नॉन मराठी नेता सुभाष गावधर यांना Good job… Good co-ordination… अश्या अद्भूत शब्दांनी प्रोत्साहीत करत धीर देताना दिसत आहेत. मंडळालाही त्यांच्याकडून अश्याच कामगिरीची अपेक्षा.

१४. नेहमीच पाठीमागून बोलणारे दोन्ही पार्टीतील काही अतिहुशार नेते ग्रुपमध्ये मात्र मूग गिळून गप्प. परंतु हेच नेते रात्री अपरात्री कॉर्नर सभा घेऊन तसेच फोनव्दारे स्थानिक मतदारांना भडकवत असल्याची पुराव्यानिशी माहिती.

१५. ज्यांच्या सॉरी मुळे हे प्रकरण उद्भवलं ते अशोक माळघट आपला भ्रमणध्वनी बंद करुन मोजक्याच कार्यकर्त्यांसहीत अज्ञातस्थळी लॉकडाऊन झाल्याची माहिती.

१६. एकूणच प्रकरणामध्ये धडाडीचे नेते सुंदर माळघट यांच्याकडून बरेच भाष्य केले जाईल अशी अशोक माळघट यांना अपेक्षा होती. परंतु सुंदर माळघट यांनी मौन धारण करणेच पसंत केले. यामागे मोठे राजकारण शिजल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

१७. ज्यांच्या ‘सोरगत जुळव’च्या जोक्समुळे हे प्रकरण घडले ते संजय गावधर अति दडपणाखाली असल्याची सोशल मिडीयावर चर्चा. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण इथेच मिटवण्यासाठी प्रमुख नेत्यांना ३ - ३ बॉयलर कोंबड्या लाच देताना संजय गावधर यांना पोलिसांनी केली रंगेहात अटक.

१८. सध्यातरी हे वाकडा नाव प्रकरण शांत झालं असल्याचे वाटत असले तरी भविष्यात हे प्रकरण उग्र रुप धारण करेल असे राजकीय जाणकरांचे मत आहे.

याबरोबरचं हे ‘वाकडा नाव प्रकरण’ बातमी पत्र संपलं. जय गावधरवाडी.

 







No comments:

Post a Comment