‘प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमच आमचं सेम असतं...’ अशा कविता, शब्दरचना आपण नेहमीच वाचत, लिहीत असतो. परंतु खरचं हे प्रेम सेम असतं? म्हटलं तर असतं... म्हटलं तर नसतं... प्रत्येकाच्या आयुष्यातील हे प्रेम वेगवेगळ्या रुपाने समोर येत असतं. प्रेमाची भाषा, भावना, रंग, रुप, ओढ नक्कीच भिन्न भिन्न असते. आयुष्यात कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाला या-ना-त्या नात्यातून प्रेम भेटत जातयं. आपणही प्रत्येकजण वेगवेगळ्या अंगाने ते अनुभवत असतो. शिवाय ‘प्रेम’ या दोन शब्दामुळेच तर विश्वातील प्रत्येक घटकाला उत्साही जीवन जगण्यासाठी ‘टॉनिक’ मिळत असतं.
मला वाटतं प्रेम हे दोन नात्यातील अतूट बंधन, आपुलकी, ऐकमेकांच्या चुकांवर
पांघरुण घालणारं, कर्तृत्वाला प्रोत्साहीत
करणार, तर कधी रागावणार आणि सुख:दुख: मध्ये वाटेकरी बनणार असं हे ‘अतूट नांत’ म्हणजेच ‘प्रेम’. मग त्यात मानव नात्यातील कुटलेही दोन कींवा त्याहीपेक्षा जास्त घटक
असू शकतील. स्री-पुरुष, पुरुष-पुरुष किंवा
स्री-स्री या मानवरुपी प्रेमासोबतच आपण प्राणी, पक्षी यासारख्या सजीव
घटकांमध्येही प्रेम पाहत असतो. इथपर्यंतच नाही तर ते देशप्रेमही असू शकत.
प्रेम म्हटलं की सर्रास
चित्र उभ राहतं किंवा ते आपसुक आपल्या नजरेसमोर येतं ते दोन तरुण तरुणींमधील
प्रेम. पण नाही, ह्या प्रेमाचा प्रवास
चोहोबाजूला पसरलेला आहे. आपण थोडतरी खरचटलो तरी काळजीने व्याकूळ होणारी, स्वत:च्या जीवापलीकडे जपणारी
आपली आई म्हणजे प्रेम.
स्वत: पायात फाटकी चप्पल घालून
दगड-धोंड्यामध्ये चालणारे, शेतात राबणारे, मात्र मुलांसाठी नवीकोरी चप्पल घेऊन देणारे आपले बाबा म्हणजे प्रेम.
कीतीही मस्ती केली आणि
रात्री उशीर झाला तरी कोणालाही चाहूल न लागता दरवाजा उघडणारे आपले आजी-आजोबा
म्हणजे प्रेम.
कीतीही वाद झाला तरी दादा
जेवलास का? अशी विचारणारी बहीण म्हणजे
प्रेम.
आपला पगार कमी असला तरीही
भाऊबीजच्या दिवशी तीच्या आवडीचा ड्रेस घेणारा भाऊ म्हणजे प्रेम.
घरातील सर्वांची काळजी घेणारी
मात्र स्वत:ची काळजी न घेता नवऱ्याला हवं नको ते डोळ्यात तेल घालून तत्पर असणारी आपली
बायको म्हणजे प्रेम.
यासारखी समाजातील अनेक
प्रेमाची नाती रुबाबदारपणे नांदत आहेत. प्रेमाच्या नात्यांमध्ये कीतीही चढ उतार
येऊ दे, आप-आपसात कडवटपणा,
वादविवाद
असला तरीही आयुष्याच्या अंतापर्यंत हे प्रेम टिकून असतं. ‘आपली माणसं आपलं प्रेम’ अश्या रक्ताच्या नात्यातील असो वा अन्य
कोणत्याही नात्यांच्या ऋणानुबंधातून निर्माण झालेलं, गुंतुन
राहीलेलं हे प्रेम असो. अशा या विविध नात्यातून निर्माण झालेल्या प्रेमातील एक
सर्व परिचीत प्रेम म्हणजेच दोन तरुण तरुणींच प्रेम. ज्याला समाज प्रेम कहानी
म्हणून ओळखतो. बऱ्याचअंशी अशा प्रेमाला माणूस ‘स्वत:चं ते प्रेम आणि दुसऱ्याचं
ते लफडं’ याच शब्दांनी संबोधित असतो.
आयुष्यातील गुलाबी दिवस कधीही संपू नहेत असे हे दिवस. हे दिवस तारुण्याच्या
उंबरठ्यावर खूपच उफाळून येतात. ‘सोळावं वरीस धोक्याचं
गं.... सोळावं वरीस धोक्याचं’ या लावणीप्रमाणे खरंच हे वर्ष प्रत्येकाच्या
आयुष्यातील धोकादायक वळणावरचं असतं. नेमक बालपणही नसतं आणि तारुण्यही नसतं. मनातील
व्दिदास्थिती याच वयात जास्त विस्फोटक असते. सगळं काही हिरवं हिरवं दिसत असतं.
प्रेम म्हणजे फक्त दोन तरुण तरुणीतीलच ओढ, आकर्षण, सौंदर्य इथपर्यंतच त्यांच्या दृष्टीने या प्रेमाची व्याख्या असते.
त्यामुळे बरेच तरुण तरुणी काळाच्या ओघाबरोबर चुकीच्या जाळ्यात अडकून जातात. परंतु
हा काळ निघून गेल्यावर त्यांना हे प्रेम म्हणजे या दोन घटकांपुरतच मर्यादित नाही
आहे तर विश्वातील त्याचा विस्तार, वावर मोठा आहे याची जाणीव होते.
तरुणाईच्या प्रेमाकडे
समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मकरित्या बदलत चाललेला असाला तरीही समाज अश्या
प्रेमाला अध्यापही मोकळेपणाने स्विकारायला तयार नाही आहे. त्याला कारणेही तशीच
आहेत. बऱ्याचवेळी एकतर्फी प्रेमातून घडत असलेल्या घटनांचे दुष्परीणामही तेवढ्याच
घातकरित्या भोगावे लागतात. काहीवेळा जाती-पातीच्या नावांखाली समाजही आड येत असतो.
अशा वेळी गुलाबी दिवसातील हे ‘प्रेम’ शब्द हत्यार होऊन आपल्यावरच
चाल करतात.
चिरंतर प्रेम हे सुंदरतेवर
अवलंबून नसतं तर ते मानसिकतेवर, वैचारिकत्येवर अवलंबून
असते. मनाने स्वच्छ असणारी कोणतीही व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर साथ देणार कारण त्या
व्यक्तीला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा गरज असते ती फक्त तुमची आणि तुमचीच. प्रेम
आजही जिवंत आहे आणि भविष्यातही असणार आहे. दुनियेमध्ये कितीही उलथापालथ होवो प्रेम
मात्र अबाधित राहणार आहे हे चिरंतर सत्य आहे. कारण प्रेमाला भाषा नसते, प्रेम हे आंधळ असतं, ते जात-पात, गरीब-श्रीमंती असा भेदभाव मानत नाही.
अशाच या प्रेमासंदर्भातील
वाचनात आलेल्या दोन ओळी आपणासमोर शेअर करायला नक्कीच आवडतील.
“काही अनोळखी हळू-हळू ओळखीचे होऊ लागतात
आपल्याला मग आपल्यापेक्षाही
प्रिय वाटू लागतात...”
तर काही वेळा हेच प्रेम
आकलनशक्तीच्या पलीकडेही असतं. अश्यावेळी खालील ओळी देखील शब्दांच्या पलिकडे जाऊन
विचार करायला भाग पाडतात.
“प्रेम म्हणजे हा एक मोठा प्रश्न
काहीजण आयुष्यभर सोडवतात
काहीजण सहजतेने सोडवतात
तर काहीजण आयूष्य सोडून सोडवतात.”
पहायला गेल्यास प्रेम हे
करायला आणि टिकवून ठेवायला फारच कठीण असतं तरीही आयुष्यातील ती एक अत्यावश्यक
गोष्ट आहे. माणसाच्या प्रत्येक श्वासासोबत प्रेमाच्या लहरी तरंगत असतात. इतिहासही
याला साक्ष आहे. मग त्या रामायण महाभारतातील अजरामर प्रेमकथा असोत, देवादिखांच्या कथा असोत कींवा तुमच्या आमच्यातील कुटल्याही नात्यातील
प्रेम असोत. या सर्व घटना यापुढेही साक्ष राहतील आणि ‘प्रेम -एक चिरंतर सत्य’ असल्याचे समाज अनुभवत राहील.
- भरत माळकर




ceramic vs titanium curling iron
ReplyDelete1 hr titanium alloy 12 min. Cooking aftershokz titanium for cooking · 2 min. Cooking for titanium prices cooking. titanium hair straightener 3 titanium muzzle brake min. Cooking for cooking.