Tuesday, July 5, 2016

रोम्यांटिक पाऊस...

कॉलेजवरुन घरी जात होतो, अचानक तो धो-धो करत येताना दिसला |
वाटलं आता ओलाचिंबच करेल, तेवढ्यातच ती छत्रीसह नजरेस पडली ||

ऐकांताच्या वाटेवर काहीच सहारा नव्हता, तीच्या छत्रीचाच आधार होता |
पण तीला कसं विचारणार, तेवढ्यातच ती म्हणाली... येतोस का? ||

नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता, तरीही अॅक्टींगचा एक भाग होता |
बहाना फक्त छत्रीचा होता, पण एकत्र येण्याचा तो एक इरादा होता ||

आमच्या एकत्र येण्याने, तो आणखीनच बरसू लागला, खळखळू लागला |
आम्हाला ओलाचिंब करुन, गडगडाटासह विजेंचा लखलखाट करु लागला ||

एवढ्यातच थंडगार झुळूक चाटून गेली, अंग शहारुन हातात हात विसावला |
कोण जाणे, लबाडाच्या मनीही आमच्याच मिलनाचा सुवर्णयोग घडवायचा होता ||

.....असा हा हवा हवासा वाटणारा रोम्यांटिक पाऊस.

-भरत माळकर

दिनांक ५ जुलै रोजी टि्वटर वर थोडक्यात लिहीलेली कविता....

मी एकांती जात होतो
तू छत्रीत दिसलीस
आपण एकत्र आलो
तो अधिकच बरसू लागला
लबाडाने आमच्या मिलनाचा सुर्वणयोग घडवला...हाच तो पाऊस

No comments:

Post a Comment